मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. आमची वेळ येईल तेव्हा पाहू काय होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. काल जेपी नड्डा यांनी दिलेल्या भाषणात लोकशाही दिसते का? फक्त भाजपच राहील, बाकीचे पक्ष संपुष्टात येतील असे ते म्हणत आहेत. यात विवेकाची चर्चा नाही, केवळ बळाचा वापर केला जात आहे. जनता सर्व काही पाहत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आज तुमचा वेळ आहे. पण जेव्हा तुमचा वेळ नसेल, तेव्हा तुमच्याकडे काय उरणार आहे याचा विचार करा. त्यामुळे द्वेषाचे राजकारण करू नका. लोकशाहीची हत्या करू नका. आज तुम्ही स्वतःला अजिंक्य समजता पण काळ केव्हाही बदलू शकतो. दुसरे महायुद्ध सुरू असताना सर्व काही हिटलरच्या हातात असेल असे वाटत होते. पण त्यांचे काय झाले, हे सर्वांना माहीत आहे.”
‘झुकेगा नही’ पिक्चरमध्ये नाही, प्रत्यक्षात संजय राऊतांनी दाखवले-
“जे निषेधार्थ बोलत आहेत त्यांना संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यासाठी खुलेआम केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. या दबावाला बळी पडणारे हमाम झाले. संजय राऊत झुकले नाहीत. मला त्यांचा अभिमान आहे. ‘झुकेगा नही’ पिक्चरमध्ये नाही, प्रत्यक्षात संजय राऊतांनी दाखवले.”
संजय राऊतांचा गुन्हा काय?
“संजय राऊतांचा गुन्हा काय? ते पत्रकार आहेत, निर्भिड आहेत. हा त्यांचा गुन्हा आहे का? जे योग्य वाटत नाही, ते संजय राऊत बोलून दाखवतात. हा गुन्हा आहे का? ते दबावाला बळी पडत नाहीत, हा गुन्हा आहे का?”, असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
एक दिवस सत्ता जाईल-
उद्धव ठाकरे म्हणाले, “जे सोडून गेले ते आज सत्तेची चव चाखत आहेत. जोपर्यंत सत्ता त्यांच्याकडे आहे, तोपर्यंत ते आपल्यावर हवी तशी टीका करू शकतात. एक दिवस सत्ता जाईल, मग परिस्थिती बदलेल, मग ते जेव्हा चेहरा घेऊन लोकांसमोर जातील तेव्हा लोक त्यांना त्यांचा खरा चेहरा दाखवतील.”
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । भाजपचा वंश तरी नेमका कोणता? नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा पलटवार
- Sanjay Raut | मोठी बातमी! संजय राऊत यांना ४ दिवसाची ईडी कोठडी
- Aaditya Thackeray | दोन लोकांच्या जम्बो मंत्रिमंडळात मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण तेच समजत नाहीये – आदित्य ठाकरे
- Aaditya Thackeray : चाळीसच्या चाळीस आमदारांनी राजीनामा द्यावा, बघू सत्य जिंकते की सत्ता; आदित्य ठाकरेंचं पुन्हा आव्हान
- Vishwajeet Kadam | हुकुमशाही पद्धतीने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर सुरु – विश्वजित कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

