Share

Eknath Shinde | जीवे मारण्याच्या धमक्यांवर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. यामुळे संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

एकनाथ शिंदे यांना आत्मधातकी स्फोट घडवून मारण्याचा कट :

शिवसेनेमध्ये (Shivsena) बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी सत्ता मिळवली. एवढेच नाही तर त्यांचा स्वतःचा एक मोठा गट देखील स्थापन केला. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांची जोरदार चर्चा रंगू लागली. अशातच एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जिवे मारण्याचा कट रचण्यात आला असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती.

“मला जनतेमध्ये राहायला आवडतं…” :

यादरम्यान, आपली प्रतिक्रिया देत असताना मला जनतेमध्ये राहायला आवडतं, अशा धमक्यांमुळे माझ्या वागण्यात कोणताही बदल होणार नाही जनतेमध्ये जाण्यास मला कोणीही रोखू शकणार नाही अशा बाबींचा परिणाम यापूर्वीही झालेला नाही आणि भविष्यातही होणार नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी सुरक्षतेच्या दृष्टीने योग्य त्या सूचनाही दिल्या आहेत, असं देखी शिंदे म्हणाले आहेत.

शिंदे यांना जिवे मारण्याचं पत्र देखील मंत्रालयाच्या कार्यालयात :

दरम्यान, मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचं पत्र देखील मंत्रालयाच्या कार्यालयात आलं होतं. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना माओवाद यांनी देखील जीवे मारण्याची धमकी दिली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!