🕒 1 min read
मुंबई : वेदांता ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं दिसून येतं आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षनेत्यांवर तर सत्ताधारी पक्षनेते विरोधी पक्षनेत्यांवर आरोप, टीकेबाजी करत आहेत. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या वादामध्ये उडी घेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले रामदास आठवले ?
महाविकास आघाडीमुळे वेदांताचा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. वेदांत-फॉक्सकॉन हा खासगी प्रकल्प आहे. महाविकासआघाडी सरकारने त्या कंपनीच्या मालकाशी बोलायला हवं होतं. त्यांना ज्या सुविधा पाहिजे होत्या, त्या सुविधा पुरण्याचं आश्वासन देणं आवश्यक होतं. परंतु महाविकास आघाडी सरकारने ते न दिल्याने तो प्रकल्प गुजरातला गेला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच, वेदांताचा प्रकल्प जरी गुजरातला गेला असला, तरी उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशात क्रमांक एकचं राज्य आहे आणि कायम राहील, असा दावा देखील रामदास आठवले यांनी याठिकाणी केला असल्याचं समजतं आहे.
पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, आणखी मोठे उद्योग आम्ही राज्यात आणणार आहोत. हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. आमचं शिंदे-फडणवीस यांचं सरकार तर आता आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडी सरकारलाच या प्रकल्प राज्यात ठेवता आला नाही.
महत्वाच्या बातम्या :
- NCP | “…असं शक्य झालं नाही, तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?”, राष्ट्रवादीचा खोचक सवाल
- Hero Splendor | हिरो स्प्लेंडर प्लस नवीन रंगात..! काय विशेष आहे ते जाणून घ्या!
- Health Hack | शाकाहारी लोकांनी प्रोटीन कसे आणि कुठून मिळवावे, जाणून घ्या!
- Raj Thackeray | प्रबोधानकार ठाकरेंच्या जयंती निमीत्त राज ठाकरेंनी करुन दिली ‘त्या’ भाषणाची आठवण
- Supriya Sule | “… एवढ्या मोठ्या नाहीत ताई”, सुप्रिया सुळेंच्या ट्विटवर संदीप देशपांडेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
