मुंबई : पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा या मागणीसाठी आज दि. 1 जून पासून रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोललनाचा धडाका सुरू झाला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आज राज्यभर अनेक ठिकाणी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षण मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. आज पासून सुरू झालेला रिपाइं चा आंदोलन सप्ताह राज्यभर दि. 7 जून पर्यंत सुरू राहणार असून महाविकास आघाडी सरकारने दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा रामदास आठवले यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मुंबईत ताडदेव सर्कल येथे पदोन्नतीमध्ये अरक्षणाच्या मागणीसाठी रिपाइं चे सोना कांबळे, नामदेव सरवदे, ऍड. आशा लांडगे, चंद्रकांत कसबे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर चेंबूर गोरेगाव, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणी रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
आठवले म्हणाले की, आघाडी सरकार हे दलित विरोधी सरकार ठरले आहे. मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार ने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी राज्यभर प्रत्येक जिल्हा अधिकारी आणि तहसील कार्यलयावर दि.1 जून ते 7 जून पर्यंत रिपाइं तर्फे आंदोलन सप्ताह आयोजित केला आहे. तसेच, या आंदोलनात कोरोना प्रसाराचे नियम पाळून गर्दी न करता आंदोलन करण्याच्या सूचना रामदास आठवले यांनी दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- करायचं तेव्हा मोदींच कौतकही केलं, मात्र आता वाईट वाटतंय – राज ठाकरे
- ‘ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवण्याऐवजी जबाबदारी पार पाडावी’
- डब्लुटीसीच्या फायनलमध्ये ‘या’ कारणामुळे न्युझीलंड भारतीय संघाला भारी पडु शकतो: दिलीप वेगंसकर
- बारावीच्या परीक्षा रद्द करा ; अरविंद केजरीवाल यांची नरेंद्र मोदींकडे मागणी
- काही जिल्ह्यांत निर्बंधांमध्ये शिथिलता तर ‘या’ जिल्ह्याच्या सीमा आता १५ जूनपर्यंत बंद !

