Share

रामदास आठवलेंच्या मते जनता ठाकरे सरकारला १०० पैकी ‘एवढे’ गुण देईल

Published On: 

मुंबई  – हात धुवुन मागे लागेल अशी जाहीर धमकी विरोधी पक्षांना देणे ही मुख्यमंत्र्यांची संविधानिक दृष्ट्या चूक आणि लोकशाहीला मारक भूमिका आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडी सरकार ने वर्षभर केलेले कामाची आधारावर राज्य सरकारला किती गुणा द्यावेत याचा जनतेला प्रश्न केला तर जनता महाविकास आघाडी सरकार ला नापास सरकार अशी संभावना करीत 100 पैकी 30 गुण देईल असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

कोरोना च्या संकटात राज्य सरकार ने निर्णय घेण्यात केलेली दिरंगाई; विजबिल माफीवरून जनतेच्या डोळ्यांत राज्य सरकार ने केलेली धूळफेक  आणि कंगना राणावत; अर्णब गोस्वामी प्रकरणी राज्य सरकार ची दिसलेली सुडबुद्धि हे राज्य सरकार ला शोभणारे नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात धुवून विरोधकांच्या मागे लागणार अशी धमकी देणे हे संविधानिक पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीला शोभणारे नाही; लोकशाहीत विरोधकांचा सन्मान करायचा असतो; प्रश्न विचारणाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे असते. हात धुवुन मागे लागायचे नसते. विरोधकांच्या मागे हात धुवून लागणार ही धमकी संविधानिक दृष्ट्या चूक,लोकशाहीला मारक भूमिका आहे असे मत  रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!