🕒 1 min read
सांगली:- राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. म्हैसाळ ही जयंत पाटील यांची सासुरवाडी आहे. 17 जागांच्या या ग्रामपंचायतीत जयंत पाटील यांचे पाहुणे राऊळे उभे होते. मात्र भाजपने इथे मोठा विजय मिळवला. जयंत पाटील यांची सासरवाडी असलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे.
म्हैसाळ ग्रामपंचायतीमध्ये भाजपाला तब्बल 15 तर राष्ट्रवादीला फक्त 2 जागांवर विजय मिळाला आहे. इतकंच नाही तर म्हैसाळ ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झालं आहे.
महत्वाच्या बातम्या
- एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; गावातील पराभवानंतर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया
- राणेंना धक्का देणारा अजुन जन्माला आलेला नाही, ना पुढे येणार – नितेश राणे
- घासून नाय, तर विरोधकांची ठासून !, काकोळी ग्रामपंचायतवर फडकला मनसेचा झेंडा
- भाजपच नंबर एकचा पक्ष ठरेल; भाजपचे प्रवक्ते उपाध्येंचा दावा
- पवारांकडून मुंडेंना अभय; ठाकरेंनी निर्णय घेणं महत्त्वाचे – प्रकाश आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
