मुंबई : मेट्रो करशेडसाठी कांजूर मार्गच्या जागेसाठी राज्य सरकारने जास्त आक्रस्ताळेपणा करू नये. संबंधित जागा केंद्र सरकारची असल्याचे उच्च न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गच्या जागे साठी केंद्र सरकारशी चर्चा करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
कांजूरमार्गची जागा राज्याची असल्याचा कांगावा राज्य सरकारने केला. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाने कांजूरमार्गची जागा केंद्र सरकार ची असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे राज्य सरकार ने केंद्र सरकारशी चर्चा करून मार्ग काढावा. जोपर्यंत केंद्र सरकार परवानगी देणार नाही तोपर्यंत कांजूरमार्गच्या जागेवर मेट्रोचे कारशेड राज्य सरकारला उभारता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारशी बोलून मार्ग काढावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
दरम्यान, रेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहे. मुंबई मेट्रो-3च्या कांजूरमार्गमधल्या कारशेडच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे. सध्या परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या विरोधकांसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन हे आंदोलन कमी व जत्रा जास्त झाली आहे’
- तुकाराम मुंढेंना नडणाऱ्या संदीप जोशींनी दिला महापौरपदाचा राजीनामा!
- फायझर लसीमुळे महिलांना दाढी आल्यास कंपनी जबाबदार नाही : ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बाेल्साेनाराे
- अनुसुचित जाती जमातींच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध – बाळासाहेब थोरात
- केंद्र सरकारने मका आणि बाजरी खरेदीची मर्यादा वाढवावी – छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

