🕒 1 min read
नागपूर : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे आणि नागपूर महापालिकेचे मावळते महापौर संदीप जोशी यांच्यातला वाद हा सर्वश्रुत आहे. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या महापालिकेत तुकाराम मुंढे यांची आयुक्त म्हणून वर्णी लागल्यानंतर महापौर जोशी व मुंढे यांच्यात अनेक निर्णयांमुळे वाद निर्माण झाले होते. तुकाराम मुंढे यांची कार्यशैली ही जनतेला भावते. तर दुसरीकडं वाद वाढत असल्याने तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करून मुंढे यांची तक्रार केली होती.
दरम्यान, महापौर संदीप जोशींनी यापुढे कोणतीही महापालिका निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार अनिल सोले यांचं तिकीट कापून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. परंतु जोशींना भाजपचा बालेकिल्ला राखता आला नाही. संदीप जोशी यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
महानगरपालिकेत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना जोशींनी जो त्रास दिला, त्याचे परिणाम त्यांनी या निवडणुकीत भोगले, अशी चर्चा सुरु झाली होती. आता, जोशींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्यानंतर दयानंद तिवारी हे महापौर होतील असा निर्णय पक्षाने घेतला होता. त्यामुळे नियोजित कार्यकाळ संपल्यानंतर जोशींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
यावेळी त्यांनी आपल्या वर्षभरातील कामाचा लेखाजोगा मांडला. तर, काही कामे राखडल्याची खंत देखील व्यक्त केली. राहिलेले कामे नवनियुक्त महापौर दयानंद तिवारी पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच, सुलभ शौचालयांसाठी जागा शोधली, डिझाईन तयार केले, कार्यादेशही निघाले. परंतु तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौर निधी खर्चालाही अडवून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना लसीला मुस्लिम-ज्यू धर्मगुरूंचा विरोध; काय आहे नेमकं कारण?
- पश्चिम बंगालमध्येही चालणार पवार पॉवर? ममतादीदींच्या मदतीसाठी शरद पवार जाणार धावून?
- Breaking: कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे उद्यापासून राज्यात संचारबंदी; मुख्यमंत्री ठाकरेंनी उचललं महत्वाचं पाऊल
- संतापजनक! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरची मालिका पडली बंद; कारण जाणून व्हाल हैराण
- ‘मोदींच्या विरोधकांसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन हे आंदोलन कमी व जत्रा जास्त झाली आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

