मुंबई – देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यात काही ठिकाणी वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवताना शासन आणि प्रशानसनावर प्रचंड ताण येत आहे. सरकारी यंत्रणा हतबल ठरत आहेत. वाढत्या मृत्यूदराबरोबरच भीतीही वाढत आहे.
अवघे जग या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी कोरानाची साथ आणि कोरोनाबळींबाबत वादग्रस्त विधान केले आहे.कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी आज येथे केले आहे.
सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडे सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.ते म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही. मास्क लावायची गरज आहे का? एकीकडे दारू सुरु आहे, लोक गांजा ओढत आहेत. अफू सुरु आहे, मग मास्कने काय होणार आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
एवढ्यावरच न थाबता भिडे यांनी कोरोनाच्या अस्तित्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले,मुळात कोरोना अस्तित्वात आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. तो मानसिक आजार आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला अजिबात अक्कल नाही’ असं म्हणत सरकारवर देखील तोफ डागली.
दरम्यान, भिडे यांच्या या वक्तव्याचे आता राजकीय पडसाद देखील पाहायला मिळत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी भिडे यांच्यावर टीका केली आहे.संभाजी भिडे हे संविधानविरोधी, जनताविरोधी विधाने करत असतात. आतातर कोरोना हा रोगच नाही म्हणून वैज्ञानिक, डॉक्टरांचा अपमान केला आहे. मास्क घालू नका म्हणून कायद्याला आणि नियमाला विरोध केला आहे. अशा संभाजी भिडे मोकळे सोडणे म्हणजे खोडसाळ वक्तव्याचा प्रसार करणे होईल म्हणून संभाजी भिडे यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष महाराष्ट्र सरकारला करत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- क्रिकेटच्या देवाने कोरोनाला हरवलं; सचिनला रुग्णालयातून डिस्चार्ज
- लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना म्हणावे लागले, ‘…तो मी नव्हे’
- वाझे शिवसेनेचा माणूस असून सरकारवर आरोप करतो म्हणजे ते सत्य असेल – आठवले
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीला बोलावून आमची फसवणूक केली
- 25 दिवसांचा लॉकडाऊनचा भाजपने निवेदन देत औरंगाबादेत केला निषेध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

