🕒 1 min read
अंबाजोगाई(प्रतिनिधी)- मागच्या पाच-सात वर्षात राष्ट्रीय कॉंग्रेस हा पक्ष आडगळीला पडला होता. अपघाताने महाआघाडीच्या पाठीमागे उभा राहुन सत्तेत आला. एका वर्षात राज्यातील शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न निर्माण झाले. त्यासाठी सरकार अपयशी ठरलं असुन मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत करता आली नाही. खरीपाचा विमा मिळालेला नाही. सोयाबीन निकृष्ट उगवले. हे सारे प्रश्न असताना कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात केंद्रात सुरू असलेल्या कृषी कायद्याचा आधार घेवुन भाजपवर टिका करतात हे हास्यास्पद आहे अशी टीका भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
माध्यमांना दिलेल्या प्रसिधीपात्रकात ते म्हणतात, राज्यात शेतकरी खितपत ठेवला आणि आता मोर्चा काढुन राजकिय अस्तित्व दाखवण्यासाठी ही मंडळी कृषी कायद्यात पराचा कावळा करत ओरडत आहे.या राज्यामध्ये शेतकरी संपुर्णपणे उद्धवस्त झाला आहे. यंदा पाऊसकाळ चांगला झाला हे खरं असलं तरी शेवटी मराठवाडा, विदर्भ आणि काही जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी नेस्तनाबुत केला आहे. खरीपाचं कुठलंही पिक शेतकऱ्यांच्या पदरात पडलं नाही. जमिनी खरडुन गेल्या. जनावरे मृत्युमुखी पडली. सुरूवातीला विदर्भामध्ये तर सोयाबीन उगवलंच नाही. कापसाची परिस्थिती तशीच आहे. कसाबसा कापुस पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर टाकला तर शेतकऱ्यांना त्याचे पैसे पण मिळेनात.
स्वत: मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीची पाहणी केली होती. आम्ही 10,000रूपये हेक्टरी देवु अशी घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसावा तसं प्रशासकिय यंत्रणेला हाताशी धरून जास्तीत जास्त आणेवारी पन्नास टक्यापेक्षा जास्त कशी जाईल याची काळजी घेतली. ज्यामुळे सरसकट मदत न करता जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार कॉंग्रेसने आणि सरकारने केला. शेतकऱ्यांना यंदा विमा मिळालेलाच नाही. त्यालाही राज्य सरकार जबाबदार आहे कारण अनेक जाचक अटी विमा कंपन्यांनी घातल्या. शेतकऱ्यांना वीजपंप घेण्यासाठी कनेक्शनच्या भावात वाढ केली.
लॉकडाऊन काळात वीजेचे बील माफ केले नाही. अशा साऱ्या प्रश्नाने शेतकरी उद्धवस्त झाला असुन सरकारच्या विरूद्ध तीव्र संताप होत आहे. ऊसाला सुद्धा एफआरपीप्रमाणे कारखानदार पैसा देत नाहीत. हे सर्व असताना राज्यातील कॉंग्रेस आणि महाआघाडीचे नेते या प्रश्नावर चिकार शब्द काढत नाहीत. मात्र स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी केंद्रात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मोर्चे काढतात. याचं नवल वाटतं.
कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नागपुरात जावुन काल भाजपवर केलेली टिका म्हणजे बालीशपणाच होय. कारण राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थोरात एक शब्दही बोलत नाहीत आणि कृषी कायद्यावर मात्र छाती फाडुन बोलतात. यावरूनच शेतकऱ्यांविषयी किती नाटकी कळवळा सुरू आहे?हे लक्षात येतं. शिवसेना, राष्ट्रवादी व इतर सत्ताधारी नेते शेतकऱ्यांच्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावर तोंड फाड केंद्र सरकारवर टिका करतात. मात्र राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत? हा सवाल आहे.
दिल्लीतील आंदोलन कॉंग्रेस पक्षाची राजकिय खेळी असुन खरा शेतकरी यामध्ये सहभागी झालेला नाही. तरी सुद्धा केवळ राजकिय फायदा घेण्यासाठी अशा आंदोलनाला फुस लावण्याचं काम कॉंग्रेस नेते करतात. राज्यात स्वाभिमानाने शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे नेते आहेत. पण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. यावर कोणताही शेतकरी नेता शिट्टी वाजवायला का तयार नाही? असा सवाल जनता विचारीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुरस्काराने महाराष्ट्र केसरी बालारफि शेखचा गौरव
- शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा दारूण पराभव
- कोथळी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात, खासदार रक्षा खडसे यांचा दावा
- कसं जनता म्हणेल तसं! विखे पाटलांच्या २० वर्षाच्या सत्तेला सुरुंग
- ‘या’ तारखेस चित्रपटगृहात रिलीज होणार शाहिदचा ‘जर्शी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
