Share

कोथळी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात, खासदार रक्षा खडसे यांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.

दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या कोथळी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. यामध्ये 11 जागांपैकी 2 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर 9 पैकी 6 जागांवर भाजपचे पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. मागील वेळी कोथळी ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे सरपंच होते, मात्र आता भाजपचा सरपंच होणार आहे. या निवडणुकीत राजकीय झालेल्या बदलामुळे मोठी जबाबदारी माझावर होती पहिल्यांदा मी बारकाईने या निवडणुकीत लक्ष घातले असून त्यात मला यश मिळाले असल्याचे भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!