Share

‘…हे तर बडतर्फ करण्यापेक्षाही भयानक’; १२ आमदारांच्या निलंबनावर राम कदमांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर केंद्राकडून इंम्पिरीकल डेटा मिळावा यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना (BJP 12 MLA’s Suspended) एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.

या प्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी राज्यसरकारने आपली बाजू मांडत म्हणले की, विधानसभेने निलंबित केलेल्या १२ आमदारांवर कायद्याच्या आधारेच निर्णय घेण्यात आला असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर (Justice AM Khanwilkar) आणि न्यायाधीश सिटी रवी कुमार यांच्या द्वी सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.

या सूनवणीनंतर भाजप नेते व आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राम कदम म्हणतात, सुप्रीम कोर्टा च्या निरीक्षणा नुसार १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन ही संविधानाच्या नियमाची पायमल्ली आहे. ५९ दिवसापेक्षा अधिक निलंबन हे तर बडतर्फ करण्या पेक्षाही भयानक असल्याची प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली आहे. तसेच निलंबन फक्त ५९ दिवसाचेच असू शकते मग महाराष्ट्र सरकार त्याचे निलंबन रद्द करण्यासाठी कशाची वाट पाहत आहे, असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!