Share

युपीएच्या अध्यक्षपदाविषयी शरद पवारांनी केले मोठे विधान

Published On: 

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए)अध्यक्षपद सोपवण्यासंबंधीच्या चर्चाना सध्या उधाण आले आहे आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील सध्याची परिस्थिती पाहता शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावे अशी भूमिका मांडली आहे.

दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी देखील पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.पी चिदंबरम यांनी शरद पवार यांची यूपीए अध्यक्ष होण्याची इच्छा असेल असं मला वाटत नसल्याचं म्हटलं आहे. हे काही पंतप्रधानपद नाही आणि स्वत: शरद पवार यांची यूपीए अध्यक्ष म्हणून जाहीर केलं जावं अशी इच्छा नसावी असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, युपीए अध्यक्षपदासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांनी युपीए अध्यक्षपदी विराजनमान होण्याचे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे.

‘माझ्याकडे युपीए अध्यक्ष होण्यासाठी वेळ किंवा तसा विचार नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच येत नाही,’ असेदेखील शरद पवार यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!