औरंगाबाद:- राज्यातील मुदत संपणार्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. खेडोपाड्यांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फारसा प्रभाव नसलेल्या शिवसेनेनेही यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. औरंगाबादमधील ग्रामपंचायंतींवर भगवा फडकवण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कंबर कसली आहे. त्यांनी सध्या गावागावात बैठका सुरु केल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील 618 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामपंचायतींच्या राजकारणात उडी घेतली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारांच्या अनेक गावांमध्ये बैठका सुरू आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कृषी कायदे रद्द करण्याची मागणी लोकशाहीला घातक – रामदास आठवले
- ‘या स्थितीत पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर, त्यांचे कौतुक करायला हवे.’
- इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात आढळून आले १६ जण कोरोना पॉझिटिव्ह
- नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज : अजित पवार
- सोनिया, राहुल आणि प्रियंका यांचा इतिहास आम्हाला पुन्हा उगाळायला लावू नका : भाजपा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

