नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे वैयक्तिक कारणासाठी विदेशात रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे कुठे गेले आहेत, हे पक्षाकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी काही दिवसांसाठी वैयक्तिक कारणासाठी परदेशात जात आहेत. परिणामी राहुल गांधी आज काँग्रेसच्या स्थापना दिवसालाही उपस्थित राहू शकणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले,केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते तारिक अन्वर या बैठकीला हजर असतील.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी कतार एअरवेजच्या फ्लाइटने इटलीतील मिलानसाठी रवाना झाले आहेत. त्यांची आजी इटलीत राहते आणि त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी यापूर्वीही तिथे गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांकडे यूपीएचं नेतृत्व?; पी चिदंबरम म्हणाले…
- ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी अब्दुल सत्तारांच्या गावागावात बैठका सुरु
- युपीएच्या अध्यक्षपदाविषयी शरद पवारांनी केले मोठे विधान
- ‘कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय’
- अखेर अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार, जानेवारीत आंदोलन करणार


