सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांचं समर्थन करताना शिवसेना खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेचा माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी समाचार घेतला आहे. सुशांत सिंग प्रकरण हे सीबीआय कडे आहे. ती तुमचीच तपास यंत्रणा आहे. मग जो तपास केला, तो सीबीआय जाहीर का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
ज्यांचा या प्रकरणाशी कोणताच संबध नाही. त्यांच्यावर आरोप करायचे, बदनामी करायची. राणे ज्यांच्यामुळे घडले ज्या कुटुंबामुळे ते मुख्यमंत्री झाले त्यांच्या बद्दल बोलताना जिभ थोडीतरी चाचरली पाहीजे. संजय राऊत तुमच्याबद्दल बोलले होते का? मग तुम्ही का बोलता, लोकसभेत तुम्हाला उत्तर देता येत नाही मग इथे येऊन का बोलता? जर किरीट सोमय्याच्या पत्रकार परिषदेला पुष्टी देण्यासाठी पत्रकार परिषद घेता. मग तुमच्यावर किरीट सोमय्यानी त्यावेळेस केलेले आरोप खरे मानायचे का, तुम्ही त्यावेळेस सामोरे न जाता लोटांगण घालून तुम्ही भाजप मधे गेलात. सोमय्या कोणाबद्दल बोलले राऊत कोणाबद्दल बोलले त्यात तुम्ही का उडी घेता, असा प्रश्न दिपक केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
ते १९ बंगले उद्धव ठाकरे आणि वायकर परिवाराचेच’; किरीट सोमय्यांचा दावा
“प्रत्येक कार्यकर्ता आमच्यासाठी व्हीआयपीच…”, रुपाली चाकणकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा
“मोदींनी शिवजयंतीला महाराष्ट्राची माफी मागवी”, नाना पटोलेंची मागणी
“किरीट सोमय्या देशातील सर्वांत मोठा चोर, लफंगा, आणि डाकू”, संजय राऊत संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

