Share

‘राक्षसी वृत्तीची बाई’; कंगनाच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : कंगनाने भारतीय स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत तिच्यावर संताप व्यक्त केला जात असतानाच आता तिने थेट महात्मा गांधींवर टीका केली आहे. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं म्हणत पुन्हा वाद निर्माण केला आहे. यावरून आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘हे भयानक आहे, ही राक्षसी वृत्तीची बाई आहे. एकावर एक नीचपणाचा कळस करते, त्यामुळे सकाळी सकाळी या बाईचं नावंही घेऊ नका,’ असे म्हणत असं म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

काय म्हणाली कंगना? 

कंगनाने महात्मा गांधींवर निशाणा साधत म्हटलं की, ‘हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते,आपले हिरो हुशारीने निवडा’, असे यामध्ये तिने म्हंटले आहे.

पुढे ती म्हणाली, ‘महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी व्हावी अशी महात्मा गांधींची इच्छा होती असे काही पुरावे दर्शवतात. या सर्वांना तुमच्या आठवणींच्या एकाच बॉक्समध्ये ठेवणं आणि प्रत्येक वर्षी जयंतीला शुभेच्छा देणं पुरेसं नसून मूर्खपणा आहे’, असंही कंगनाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!