Share

“माझ्या नवीन नात्यासाठी बुरखा ही घालायला तयार” ; राखी सावंतचं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  राखी सावंत सध्या तिच्या नवीन बॉयफ्रेंडमुळे माध्यमांमध्ये चांगलीच चर्चेत आहे. तिचा नवीन बॉयफ्रेंड आदिल याच्यावर ती खूप प्रेम करते, असे राखीने म्हंटले होते. आता राखी म्हणाली की, “मी आमच्या नात्यासाठी काहीही करू शकते. आदिलसाठी मी बुरखा घालायला देखील तयार आहे.” राखीचे असे वक्तव्य ऐकून चाहते मात्र हैराण झालेले दिसत आहेत. व्यावसायिक असलेल्या आदिल खान दुर्रानीच्या प्रेमात राखी सावंत नुकतीच रिलेशनशिप मध्ये आली आहे.

राखी म्हणाली, आदिलच्या प्रेमासाठी मी काहीही करण्यास तयार आहे. तिने आदिलसोबत आपल्या भावी आयुष्याचे नियोजन देखील सुरु केल आहे. राखीने मागच्या काही दिवसांपूर्वीच उर्फि जावेदच्या पार्टीमध्ये हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये देखील आदिल आणि तिच्या नात्याबद्दल तिने काही गोष्टी सांगितल्या होत्या. एका मुलाखतीत भावूक होऊन राखी म्हणाली, माझ्या प्रिय चाहत्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी. यावेळी माझे घर आणि आणि नाते कधीही तुटू नये. तो माझ्यावर खुप प्रेम करतो आणि मी पण त्याच्यावर खूप प्रेम करते.’

आदिल पेक्षा राखी सहा वर्षांनी मोठी आहे. राखी म्हणाली, “पुढे काय होईल याचा विचार करत मी जगत नाही. मी त्याच्यावर खूप प्रेम करते. आज साडी घातली तर उद्या त्याच्यासाठी मी बुरखा देखील घालू शकते” आणखी एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, ‘आदिलच्या कुटुंबाला छोटे कपडे घातलेले आवडत नाही. माझ्या नवीन नात्यासाठी मी बुरखा देखील घालू शकते.’

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!