🕒 1 min read
मुंबई : निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी आज पोटनिवडणूक जाहीर केली आहे. एकूण सहा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ज्यात महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश येथील रिक्त जागांचा समावेश आहे. तर यामध्ये आता महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे. डॉ. प्रज्ञा सातव या पती राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालवतील हे स्पष्ट झालेय. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसमधील एका गटाकडून होत आहे.
तर त्याच दरम्यान माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आणि माजी खासदार अविनाश पांडे यांच्या नावांचीही जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच राजीव सातव हे गुजरातचे काँग्रेस प्रभारी होते. सातव यांच्या निधनानंतर अद्याप ते पद रिक्तच आहे. त्यामुळे गुजरात काँग्रेस प्रभारी पदासाठीही पक्षातील अनेक नेते इच्छूक आहे. या दोन्ही पदासाठी दिग्गज नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष कुणाला संधी देते याकडे लक्ष लागले आहे.
जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश येथील रिक्त जागांचा समावेश आहे. एकूण सहा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. तर मध्यप्रदेशातील एका जागेचा, पश्चिम बंगालमधील एका जागेचा, तमिळनाडूमधील दोन रिक्त जागांचा समावेश आहे. ४ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच दिवशी निकाल सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल’
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- तालिबान सरकारसाठी चीनने केली ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
