मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून त्याच्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. तसेच तपासयंत्रणा केवळ खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महत्वाची कागदपत्रं लीक केली जात असल्याचा आरोपही अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे. कोर्टाने याप्रकरणी सोमवारपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे.
अनिल देशमुखांच्या वतीने वकील विक्रम चौधरी युक्तिवाद करत आहेत. तर ईडीची बाजू अमन लेखी यांच्यासह एसजी तुषार मेहता, एएसजी अमन लेखी आणि एएसजी अनिल सिंह करत आहेत. दरम्यान ईडीकडून अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावण्यात आले. मात्र ते एकदाही हजार राहिलीले नाहीत. त्यामुळे आपल्याला बजावलेले समन्स रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका त्यांनी हायकोर्टात दाखल केली आहे.
तर दुसरीकडे परमबीर सिंह यांनी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री आणि इतरांची दिशाभूल केली आहे. तो बंद दरवाज्यामागे वाझेला भेटले. दोषारोपपत्राच्या निष्कर्षावरून स्पष्ट होते आहे की, फेरफार करण्यामागील व्यक्तीची चौकशी केली जात नाही. त्यांनी भाजपच्या सांगण्यावरून अनिल देशमुख यांना टार्गेट केले. त्यामुळे परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर स्वतःला वाचवण्यासाठी आरोप केले. असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाला दिलासा नाहीचं! जावेद अख्तर प्रकरणात होणार कारवाई
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- तालिबान सरकारसाठी चीनने केली ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा

