Share

चंद्रकांत पाटलांच्या विरोधात राजू शेट्टींनी थोपटले दंड, म्हणले…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. तर चंद्र्कंत पाटील हे त्या दृष्टीने मतदारसंघाची चाचपणी देखील करत आहेत. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची तयारी दाखवली आहे. ते औरंगाबाद येथे बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांना स्वतःचा मतदारसंघ नाही. ते मतदारसंघाची चाचपणी करत आहेत. ते ग्रामीण भागातील मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर मी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार,’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी केली. चंद्रकांत पाटील हे राधानगरी, कोल्हापूर शहर व चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे पाटील जर ग्रामीण भागातील मतदारसंघातून निवडणुक लढवत असतील तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितल.

दरम्यान मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. कारण मराठवाड्यासह राज्यात मोठा दुष्काळ आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. अशावेळी त्यांना दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत, असे शेट्टी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!