Share

Jitendra Awhad | चंद्रकांत पाटील यांच्या विषयी केलेलं ‘ते’ ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं डिलीट; चर्चांना उधाण 

Published On: 

🕒 1 min read

Jitendra Awhad | मुंबई : मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फुले-आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर मनोज गरबडे नावाच्या व्यक्तीने अचानक शाईफेक (Ink Throwing) केल्याने एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घडलेल्या प्रकाराचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनीही ट्विट करत या प्रकाराचा निषेध व्यक्त केला होता.

“चंद्रकांत पाटील यांनी काळ जे विधान केलं होतं ते निषेधार्ह होतं. माझ्यासहित अनेकांनी त्याचा निषेधही केला. पण आत्ता काही वेळापूर्वी त्यांच्यावर झालेली शाईफेक हि इथल्या लोकशाहीला शोभेशी नाही. त्या शाईफेकीचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे”, अशा आशयाचं ट्विट जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी केलं होतं. मात्र त्यांनी आज सकाळी हे ट्विट डिलीट केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

chandrakant patil manoj garbade pune
#image_title #separator_sa #site_title Marathi Latest News | Marathi News | Marathi batmya | मराठी बातम्या |

नेमकं घडलं काय?

चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी सायंकाळी चिंचवड गाव येथे मोरया देवस्थानच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या पार्श्वभूमीवर हा शाईफेकीचा प्रकार घडला.

चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य काय?

पैठणमधल्या एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!