अनुपपूर: मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार सुनील सराफ यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. धावत्या कारमध्ये पाठिमागे बसलेल्या व्यक्तीने सराफ यांचा गळा आवळला. यासंदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मध्य प्रदेशच्या अनुपपूर जिल्ह्यातील कोतमाचे काँग्रेसचे आमदार सुनील सराफ यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. कार चालवताना पाठिमागे बसलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांना गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सराफ यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. कोतमा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
आमदार सराफ यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी ते आपल्या कारमधून कोतमाच्या सामूहिक भवानासमोरून जात होते. रस्त्यात त्यांना एक व्यक्ती भेटली. त्याला कारमध्ये बसवले. ती व्यक्ती कारमध्ये पाठिमागील सीटवर बसली होती. सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या ओळखीची ती व्यक्ती असेल असा समज त्यांचा झाला. काही वेळाने धावत्या कारमध्येच मागे बसलेल्या व्यक्तीने आमदारांचा गळा आवळला.
आमदार कार चालवत होते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कार नियंत्रणाबाहेर गेली. कार रस्त्याखाली उतरली. कशीबशी त्यांनी व्यक्तीच्या तावडीतून सुटका करून घेतली. तिघेही कारबाहेर पडले. आमदार आणि त्या व्यक्तीमध्ये धक्काबुक्की झाली. त्याचवेळी दुसरी कार आली. त्या कारमध्ये बसून हल्लेखोर व्यक्ती पसार झाली. हल्लेखोर व्यक्तीने आपण कैल्हारीचे रहिवासी अरूण असल्याचे सांगितले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- धक्कदायक : कोरोनाशी महिनाभर झुंज देणाऱ्या भाजप आमदाराचे निधन
- ‘महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही’
- कायद्यांना नाव शेतकऱ्यांचे पण फायदा अब्जाधीश मित्रांनाचं; प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका!
- हुतात्मा नितीन भालेराव अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंतिम संस्कार
- आटपाडीच्या बाजारात तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

