Share

‘मनसे’ नेत्याला कल्याण पोलिसांची नोटीस; संदीप देशपांडेंनी म्हटले, “‘शिव’ की ‘सेना’ कहलाने वाला…”

Published On: 

मुंबई: मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास महादेव भोईर यांना कल्याण, खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी नोटीस बजावली आहे. आपले कार्यकर्ते अप्रत्यक्ष विना परवाना एकत्र जमवून कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच कोणत्याही धर्माच्या, जातीच्या अथवा व्यक्तीच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य करण्यात येऊ नये, अन्यथा कारवाईचा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे. यावरच मनसे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे.

“रामचंद्र कह गये सिया से, ऐसा कलयुग आएगा, ‘शिव’ की ‘सेना’ कहलाने वाला हनुमान चालिसा से डर जाएगा..!!”, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे. राज्यात सध्या हनुमान चालीसा प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यात उद्या १ मे मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादेत जाहीर सभा घेणार आहेत. याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमके पत्रात काय म्हटले आहे?

मी सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक प्रशासन, खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण आम्हास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून फौजदारी दंड प्रक्रिया सहिता कलम १४९ प्रमाणे नोटीस देण्यात येते की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजानच्या वेळी मशिदीसमोर लाउडस्पीकर लावुन हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दिनांक ३ मे नंतर मशिदी वरील भोगे काढून टाकणे बाबत चेतावणी दिली आहे. तरी आपणांस याद्वारे सुचीत करण्यात येते की, आपन अथवा आपले कार्यकर्ते / समर्थक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विना परवाना एकत्र जमवुन गर्दा होईल असे कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच कोणत्याही धर्माच्या, जातीच्या अथवा व्यक्तीच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य करू नये ज्यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनीक शांतता भंग होईल.

आपणास सदरची नोटीस देऊनही आपण कार्यकर्ते जमवून कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य केल्यास आपल्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!