अहमदनगर : अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी सबस्टेशनमधून जिल्हा रुग्णालयाला कायदेशीर ‘सिंगल पॉईंट ऑफ युज’ पद्धतीने वीज पुरवठा दिलेला आहे. परंतु, या कायद्याला बगल देत चक्क दीड किमी अंतरावरील खासगी रुग्णालयाला यातून वीज दिलेली आहे. ही गोष्ट समोर आल्यानंतर चौकशीचे आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले. महावितरणकडे याबाबत खुलासा मागवत त्याचा अहवाल चौकशी समितीला सादर करण्यास सांगितले आहे.
जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागाला शनिवारी आग लागली. यात ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनासह राज्य सरकारही हादरले. शनिवारी रात्रीपर्यंत ७ मंत्री, तर रविवारी आरोग्य मंत्र्यांसह २ मंत्र्यांनी नगरला धाव घेत जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शासकीय विश्रामगृहावर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, बांधकाम विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली.
त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. नंतर विधानपरिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यादेखील जिल्हा रुग्णालयात आल्या. तेथे दोघांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बंद कक्षामध्ये चर्चा केली. यानंतर शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना भेटून दुर्घटनेविषयी माहिती दिली. युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड व सामाजिक कार्यकर्ते गिरीश जाधव यांनी त्यांना बेकायदेशीरपणे जिल्हा रुग्णालयातील वीज खासगी रुग्णालयास दिल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे महावितरण तसेच संबंधित अधिकाऱ्यांना चाैकशीचे आदेश दिले. चौकशीनंतर संबंधितांवर निश्चित कारवाई केली जाईल, अशी माहिती उपसभापती गोऱ्हे आणि टोपे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोविड-१९’मुळे देशाला व राज्याला आरोग्यमंत्री आहेत हे निदान समजले तरी- संजय राऊत
- केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार- नाना पटोले
- ‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज- राजेश टोपे
- ‘अशाने भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर कृत्य करण्याचा आत्मविश्वास वाढतोय’

