🕒 1 min read
जालना: देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील (Children between the ages of 15 and 18) मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून म्हणजेच ३ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान जालना येथे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे एक मागणी केली आहे.
राजेश टोपे यांनी केंद्राकडे १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मागणी केली आहे. तसेच लॉकडाउनबाबत सर्वच राज्यांना समान प्रोटोकॉल लागू करावा अशी मागणीही केंद्राकडे केली आहे. तर शाळेमध्ये लसीकरण करण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ असेही ते म्हणाले आहेत.
राज्यात ओमायक्रॉन रुग्ण वाढले असले तरी लॉकडाउनची परिभाषा प्रत्येक राज्यात वेगळी आहे. त्यामुळे लॉकडाउनबाबत राज्यांना समान निकष असायला हवे. मुलांच्या लसीकरणाची मोहीम शाळेत राबवण्याची आमची इच्छा होती पण लसीकरणामुळे लहान मुलांना काही त्रास झाल्यास तात्काळ उपाय करणे गरजेचे आहे त्यामुळे दवाखान्यात लसीकरण करण्यात येत असल्याचेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आपल्यामुळे एसटीचे ९ लाखांचे नुकसान; प्रशासनाच्या नोटिसा पाहून कर्मचाऱ्यांना भोवळ..!
- धोनी आणि पोनी; साक्षीने शेअर केला मजेदार व्हिडिओ
- जालना ते खामगाव या रेल्वेमार्गास राज्य सरकारने पन्नास टक्के खर्च करावा- रावसाहेब दानवे
- “डी कॉकच्या निवृत्तीचा कोणताही परिणाम होणार नाही”, डीन एल्गरचा भारताला इशारा
- भाजप खासदाराचे जे.पी नड्डा यांना पत्र, स्वत: भगवान कृष्णाने प्रेरित केल्याचे सांगत केली ‘ही’ मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
