Share

अनिल देशमुखांच्या शंभर कोटी बाबत पोलिस उपायुक्तांनीच दिले उत्तर, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. ही समिती सध्या शंभर कोटी वसूली प्रकरणी चौकशी करत आहे. या चौकशीतून अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी खरंच शंभर कोटी वसूली करण्यासाठी सांगितले होते का, या प्रश्नावर आता पोलिस उपायुक्त राजू भुजबळ (Raju Bhujbal) यांनी उत्तर दिले आहे. चांदिवाल समितीसमोर पोलिस उपायुक्त भुजबळ यांची उलटतपासणी झाली. यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. भुजबळ म्हणाले, १ मार्च ते १० मार्च २०२१ मध्ये मी विधानसभा बंदोबस्ताला असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, ४ मार्चला नियमित बैठक ज्ञानेश्वरीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत होती. या भेटीवेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील सोबत असताना संजीव पलांडे हे मला भेटले. त्यावेळी पैशांसंदर्भात कुणासोबत आणि कोणतीही चर्चा झालेली नव्हती. त्यावेळी गृहमंत्रीही बंगल्यावर नव्हते. मुंबईतील १ हजार ७५० बार मधून वसुलीचे आरोप करण्यात आले आहेत. मुळात त्यावेळी कोरोना संकटामुळे ३००-३५० बार पैकी १७०-१७५ बार सुरू होते. यातून कुठलीही वसुली करण्यात आलेली नाही. ही बाब मी माझ्या प्रतिज्ञापत्रातही आहे. आम्ही देशमुखांना भेटायला गेलो त्यावेळी पलांडे यांनी आम्हाला कुठलेही वसुली संदर्भातील टार्गेट दिले नव्हते, असा खुलासा भुजबाळांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!