🕒 1 min read
मुंबई : राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केलेली आहे. यामुळे भाजपा, मनसेने याला विरोध केला असून ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे मनसेने सांगितले होते. पोलिस बंदोबस्त असूनही सारे निर्बंध झुगारून मनसेने ठिकठिकाणी रात्री, पहाटेच्या सुमारास दहीहंडी उभारून, मानवी मनोरे उभारत दहीहंड्या फोडल्या.
दरम्यान, या नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ‘कोविड काळात सर्व गोष्टी पद्धतशीरपणे चालू आहेत. आता नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलने झाली, त्यांची यात्रा झाली. त्यावेळी यांनी हाणामाऱ्या केल्या. बाकीच्यांचे मेळावे सुरु आहेत. मात्र निर्बंध फक्त सणांवरच लादले जात आहेत,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
पुढे त्यांनी शिवसेनेवर देखील टीकास्त्र सोडलं. ‘सन्माननीय बाळासाहेबांच्या नावाने हडपडलेल्या मुंबईतील महापौर बंगल्यावरील बिल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या दिसत नाहीत. सरकारकडून येणाऱ्या गाड्या कमी झालेल्या नाहीत. कुठेच काही कमी झालेले नाही. फक्त या सणांवरतीच कसे काय तुम्ही येता? त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातील सर्व सैनिकांना सांगितले तुम्ही बिनधास्त दहिहंडी साजरी करा. जे होईल ते होईल,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- पोलिसांकडून तो ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल – राज ठाकरे
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेने मध्यरात्री दहीहंडी फोडली; पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

