मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये काल पुन्हा एकदा टाळेबंदी व उपाययोजनांवर चर्चा झाली आहे. काल ( ५ एप्रिल ) राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना ह्या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली याची माहिती दिली आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठीचे उपाय, शाळा-कॉलेज बंद असूनही पूर्ण फी आकारणी, लसीकरण या मुद्द्यांपासून ते पत्रकारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नांपर्यंत आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला ‘मी किंबहुना वापरलं तर चालेल ना ?’ असा मिश्किल प्रश्न राज ठाकरे यांनी विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्य शैलीवर मिश्किल टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात जनतेला फेसबुक लाईव्हद्वारे संबोधताना व काही मुलाखतींमध्ये भाष्य करताना ‘किंबहुना’ या शब्दाचा वापर अनेकदा केल्याचे दिसून आले आहे. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका करून खिल्ली उडवली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
- अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार?
- देशमुखांचे बार बंद झाले; राज ठाकरेंचा सणसणीत टोला
- ‘बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी ; खेळाडूंसाठी बायो-बबल तयार’
- ‘खराब कामगिरी करीत असताना देखील नेट्समध्ये फलंदाजी सरावास नकार’
- नेमके काय सुरु राहणार आणि काय बंद असणार याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

