पुणे: महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच जातीयवादाचा मुद्दा प्रखरतेने समोर आला असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका कार्यक्रमात मांडले होते. त्यानंतर राज्यात गदारोळ माजला. त्यावर अनेक चर्चा घडल्या. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील टीका केली होती. शरद पवारांच्या या टीकेनंतर आता राज ठाकरेंनी यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरे पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. मी प्रबोधनकार ठाकरे पण वाचले अन् यशवंतराव चव्हाणपण वाचले आहेत. मी जे बोललो त्याच्या माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध हे शरद पवारांनी मला एकदा समजावून सांगावं, असं राज म्हणाले. मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष वाढला. यापूर्वी जातीजातीत मतदान व्हायचं. पण राष्ट्रवादीच्या जन्माननंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष वाढला. हे सर्वांना माहिती होतं. बोललो फक्त मी. यावर मला सांगितलं जातं प्रबोधनकारांचं पुस्तक वाचा. मी सर्वांची पुस्तकं वाचले आहेत… प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे. त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असं त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू
- कोकण पुरामुळे बुडत असताना स्वतःला कोकणचा नेता म्हणवून घेणारे कुठे होते? – भाई जगताप
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
- संभाजीराजेंनी केलं प्रकाश आंबेडकरांच कौतुक; तर अशोक चव्हाणांवर हल्लाबोल
- अशोक चव्हाणजी, आम्हीही ९६ टक्केवाले मराठे आहोत!’, संभाजीराजेंचा हल्लाबोल

