औरंगाबाद : उन्नत भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय स्तरावर कोविड जनजागृतीसाठी समन्वय संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर आणि व्हिडिओ स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
या स्पर्धेचा पहिला टप्पा म्हणजे विभागीय स्तरावरील निकाल आणि स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकूण दहा जिल्ह्यांसाठी उन्नत भारत अभियानची विभागीय समन्वय संस्था आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले सर यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करुन स्पर्धेचा निकाल जाहीर केला. पोस्टर स्पर्धेतील पारितोषिकात प्रथम बर्लीन फर्नांडिस (डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), द्वितीय मानसी बोरा (इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर ), आणि तृतीय ऐश्वर्या येमुल (अहमदनगर कॉलेज) यांचा
तसेच व्हिडिओ स्पर्धेतील पारितोषिकात प्रथम रवींद्रकुमार एन टी (महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज), द्वितीय रामय्या तनवी (संजीवनी पॉलिटेक्निक कॉलेज)आणि तृतीय शुभम केंद्रे (डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) हे विजेते आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय संस्थेचे संस्थेचे समन्वयक डॉ. टी. आर. पाटील यांनी केले. उन्नत भारत अभियानच्या प्रकल्प सहाय्यक आम्रपाली त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन केले. या स्पर्धेचे परीक्षक डॉ. शिरीष आंबेकर , डॉ जयंत शेवतेकर यांनी मनोगत केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘..यामुळेच शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली’, खा.भावना गवळींचा खुलासा
- नितीन लांडगे यांच्याविरुद्ध झालेल्या आरोपांची शहानिशा करण्याची जबाबदारी माधुरी मिसाळ यांच्यावर
- पारनेर तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया
- शेतकऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष लक्ष, रावसाहेब दानवेंचे प्रतिपादन!
- शिवसेनेच्या हल्ल्यांना आणि धमक्यांना मी घाबरत नाही – किरीटी सोमय्या

