🕒 1 min read
मुंबई : मनसे पक्षाचे नेते प्रकाश महाजन यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला हायकोर्टाने परवानगी दिल्यामुळे शिंदे गटाची मोठी कोंडी झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्याच्या राजकारणामध्ये पडू नये, असा सल्ला दिला होता, असं गौप्यस्फोट महाजन यांनी केला आहे.
प्रकाश महाजन यांचा खुलासा :
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाने आटोकात प्रयत्न केला होता, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या याचिकेला हायकोर्टात आव्हानही दिले होते. पण, हायकोर्टाने शिवसेनेला परवानगी देऊन शिंदे गटाला दणका दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली होती, त्यावेळी राज ठाकरे यांनी शिंदेंना दसरा मेळाव्याच्या वादात पडू नये असा सल्लाही दिला होता. दसरा मेळावा घ्यावा असं मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटत होतं. मी ही गोष्ट राज ठाकरे यांच्या कानी टाकली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी स्पष्टपणे नकार दिला होता. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे घट्ट समीकरण आहे. यामध्ये आपण पडू नये. कदाचित या गोष्टी टाळत्या आल्या असत्या तर आज बरं झालं असतं, असा खुलासा महाजन यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Patil | “…हे विसरलात काय आदित्यजी?”; चंद्रकात पाटलांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- Tanaji Sawant | “गेले अडीच वर्ष उद्धव ठाकरे फक्त…”, तानाजी सावंतांचे एका बाणात दोन निशाणे
- Abdul Sattar । अरे ला कारे करा, कोणी एक मारली तर तुम्ही चार मारा; अब्दुल सत्तार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
- Chandrashekhar Bawankule | “वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गमवण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार”
- Chandrashekhar Bawankule | “आदित्य ठाकरे हे खोटारडे असून…”; बावनकुळेंचा आदित्या ठाकरेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
