Share

Chandrashekhar Bawankule | “वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गमवण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार”

Published On: 

पुणे:  सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असते. आतातर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गमवण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. काल बावनकुळे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे होते. परंतू ते अठरा महिने मंत्रालयातही गेले नाहीत. त्यांच्या अशा निष्काळजीमुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला असल्याचं त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांचे हे आंदोलन म्हणजे खोटारडेपणा-

तसेच, काल शिवसेनेने पुण्याच्या वडगावमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. परंतू आदित्य ठाकरे यांचे हे आंदोलन म्हणजे खोटारडेपणा असल्याचं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, महावि सरकारच्या काळात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प उभाराण्यासाठी केलेला सामंजस्य करार दाखवा. त्याचबरोबर त्या प्रकल्पाला तळेगावमध्ये नेमका कोणता भूखंड दिला त्याचा त्यांच्या काळातील सरकारचा आदेशही दाखवावा.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!