Share

मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झालीये; भाजपची खरमरीत टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अखेर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांवर विविध याचिकांवर झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नैतिकतेचे भान राखून राजीनामा देण्याची तयारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती.

यानंतर, शरद पवार यांनी होकार दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये विविध प्रकरणांवरून भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून ते थेट दिल्लीसाठी रवाना झाल्याचे समजत आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असताना मुख्यमंत्री मात्र परमबीर सिंह यांच्या आरोपांवर काहीच बोलत नसल्याने संशय अधिकच बळावत असल्याची टीका भाजपने केली आहे. ‘सचिन वाझे यांचे प्रकरण बाहेर आले, तेव्हाच ते दिसते तितके साधे नाही, असे भाजपा नेत्यांनी सांगितले होते. अनिल देशमुखांच्या राजीनामान्यनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहेच. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अवस्था झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तरी काही बोलणार काय…?’ असा सवाल भाजपने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!