🕒 1 min read
मुंबई : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणे एनआयए आणि ईडी यांनी अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं याप्रकरणी 60 ते 70 जाणांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. यावरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांचा ट्विटः
माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे, असं राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
पाहा ट्विटः
माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे. @AmitShah @Dev_Fadnavis pic.twitter.com/BB88mEZ8hr
— Raj Thackeray (@RajThackeray) September 24, 2022
पिएफआय कडून देशात अशांतता निर्माण करण्याचा षड्यंत्रः
पिएफआय कडून देशात अशांतता निर्माण करण्याचा षड्यंत्र रचण्यात येत होतं, अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, एनआयए आणि ईडीने केलेल्या कारवाईला काही ठिकाणी विरोध होत आहे. पीएफआयवर करण्यात आलेल्या कारवाई मागे अनेक खास गोष्टी आहेत. सर्व ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली असून एवढ्या मोठ्या ऑपरेशनला अगदी शांतीपूर्ण पद्धतीने पार पाडण्यात आलं.
कार्यकर्त्यांनी अटक केल्याच्या निषेधार्थ घोषणा देत पूर्ण रस्ता अडवला होता. यावेळी त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर, असे नारे दिले होते. त्यांच्या या घोषणाबाजी मुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- AIIMS Jobs 2022 | AIIMS मध्ये प्रोफेसर पदांसाठी 72 रिक्त जागा
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का! भाजप उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश
- Narendra Modi | धक्कादायक! पिएफआयच्या निशाण्यावर होते नरेंद्र मोदी, कटासाठी ‘इतके’ कोटी पैसा जमा
- Upcoming Bike | Royal Enfield ची Bullet 350 लवकरच होऊ शकते नवीन स्टाईलमध्ये लॉंच, किंमत देखील असेल खास
- Recruitment of Teachers | ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती राज्यात केली जाणार – दिपक केसरकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
