वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या पात्र उमेदवारांना एम्समध्ये अर्ज करण्याची संधी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), जोधपूर यांनी २०२२ मध्ये प्रोफेसर, एडिशनल प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टेंट प्रोफेसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार AIIMS जोधपूरच्या अधिकृत वेबसाइट https://www.aiimsjodhpur.edu.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
AIIMS च्या नोकरीच्या अधिसूचनेनुसार, या भरती मध्ये एकूण 72 रिक्त जागा भरल्या जातील. AIIMS भरती अधिसूचना 24 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली आहे, सध्या ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख देण्यात आलेली नाही. उमेदवारांनी भरतीशी संबंधित माहितीसाठी वेबसाइटवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
प्रोफेसर पदांसाठी रिक्त जागा 2022
- प्रोफेसर: 31 पदे
- एडिशनल प्रोफेसर: 8 पदे
- असोसिएट प्रोफेसर:20 पदे
- असिस्टेंट प्रोफेसर:13 पदे
- एकूण रिक्त पदांची संख्या – 72
कोण अर्ज करू शकतात
संशोधन किंवा अध्यापनाचा चांगला अनुभव असलेल्या मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असलेले इच्छुक अर्ज करू शकतात. प्रोफेसर आणि एडिशनल प्रोफेसर पदासाठी अर्जदारांचे वय 58 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट पोस्टसाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षांपेक्षा जास्त असावी. अधिक तपशीलांसाठी खाली दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचा.
अर्ज फी
सामान्य (यूआर) किंवा ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 3,000 रुपये आहे. अनुसूचित जाती/जमाती/महिला/ईडब्ल्यूएस/बेंचमार्क अपंग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 200 आहे. लक्षात ठेवा एकदा अर्ज भरल्यानंतर शुल्क परत केले जाणार नाही.
इतका पगार मिळेल
- प्रोफेसर – पे मॅट्रिक्स लेव्हल 14A अंतर्गत रु 1,68,900-220400
- एडिशनल प्रोफेसर – पे मॅट्रिक्स लेवल 13-A2+ अंतर्गत रु 1,48,200-21140
- एंट्री लेव्हल पे मॅट्रिक्स 13-A1+ अंतर्गत सहयोगी प्राध्यापक – रु 1,38,300 – 209200
- असिस्टेंट प्रोफेसर – एंट्री लेव्हल पे मॅट्रिक्स लेव्हल 12 शैक्षणिक 8000 GP सह रु. 1,01,500-167400
- याशिवाय, 7 व्या CPC नुसार आणि इतर सर्व सामान्य भत्त्यांचा लाभ मिळेल.
महत्वाच्या बातम्या


