Share

IPL 2022 GT vs PBKS : रबाडानं उडवली गुजरातची भंबेरी; पंजाबला १४४ धावांचं आव्हान!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (GT vs PBKS) यांच्यात सामना होत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे गुजरातचा संघ २० षटकात ८ बाद १४३ धावांपर्यंतच पोहोचू शकला. पंजाबकडून रबाडाने ४ बळी घेतले.

गुजरातचा डाव

वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांना गुजरातला चांगली सुरुवात करून देता आली नाही. शुबमन (९) धावबाद झाला, तर साहा (२१) कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. हार्दिक पंड्याही एका धावेवर बाद झाला. रबाडाने ४ बळी घेत गुजरातला झुकवले. मधल्या फळीत साई सुदर्शनने अर्धशतकी झुंज दिली. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६४ धावा केल्या. २० षटकात गुजरात ८ बाद १४३ धावांपर्यंत पोहोचला. रबाडाने ३३ धावांत ४ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.
पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!