परभणी : शहरासह जिल्ह्यात शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील काही भागात गाराही पडल्या. त्यामुळे वातावरणामध्ये खुप गारवा निर्माण झाला होता. ढगाळ हवामानासह वादळी पावसाचे आणि काही प्रमाणात गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
शनिवारी सायंकाळी जोरदार वार्यासह विजांच्या कडकडाटास सुरवात झाली. त्यानंतर साडेसातच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री आठच्या सुमारास गारा देखील पडल्या. दरम्यान, शहरात दिवसभर पावसाचे तसेच थंड वातावरण नव्हते. सायंकाळी मात्र ढगाळ हवामान होऊन काहीच वेळात पाऊस सुरू झाला. यावेळी गारांचाही पाऊस झाला. दरम्यान वादळी वार्यामुळे शहरातील वीजपुरवठा बंद झाला.
संपूर्ण शहरात अंधारात लूप्त झाले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास वीजेचा जोरदार आवाज झाल्यानंतर तर शहरातील सर्वच वीजपुरवठा खंडित झाला. परिसरात जोरदार झालेल्या पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले होते. रस्त्यावर गाराही पडल्याचे दिसून येत होते.
या अवकाळी होत असलेल्या पावसामुळे पिकांना मात्र फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान होत आहे. या पावसाचा फळबागांनाही फटका बसला आहे. तर नुकसान भरपाइ करण्याची मागणी परसिरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शहरात येताय, सावधान! ‘स्वॅब’से करेंगे सबका स्वागत
- प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांचे निधन, शैक्षणीक-सामाजिक क्षेत्राची मोठी हानी
- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकडाउनमध्येही धावणार स्मार्ट सिटी बस
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

