मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाला पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे . दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) आणि हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाज नुसार आजपासून राज्यात पावसाचा जोर अजूनच वाढणार आहे. मित्रांनो राज्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जाणकार लोकांकडून केले जात आहे.
पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. दरम्यान हवामान तज्ञ पंजाबरावं डख यांचादेखील हवामान अंदाज आला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात 22 सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस कोसळणार आहे.
काल सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.
मात्र पुण्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. यामुळे पुणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी मुंबई, कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार् असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ठाणे, पालघर या जिल्ह्यात पावसाची मात्र उघडीप राहणार आहे. एकंदरीत हे जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Crime News | शिवसेना नेत्याने दुसऱ्या पत्नीला जिवंत जाळले, नंतर समुद्रात टाकली राख; 2 साथीदारांसह अटक
- Chandrashekhar Bawankule | अजित पवार भाजपच्या संपर्कात? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
- Chandrakant Khaire | “मी तुम्हाला चांगली खुर्ची देतो, उद्धवजी…”, चंद्रकांत खैरेंचं शहाजी बापू पाटलांना प्रत्युत्तर
- आत्महत्या रोखण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी…
- BIG NEWS | ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

