Share

T20 World Cup | भारत-इंग्लंड उपांत्य फेरी दरम्यान पावसाची शक्यता?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: : आज 10 नोव्हेंबर रोजी टी 20 विश्वचषक (T20 World Cup) सामन्याच्या उपांत्य फेरीमध्ये (Semi Final) भारताची (India ) टक्कर इंग्लंड (England) सोबत होणार आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान (Pakisthan) आणि न्यूझीलंड (Newzealand) यांच्यामध्ये झाला असून पाकिस्तान हा सामना जिंकून अंतिम फेरी (Final) साठी पात्र ठरला आहे. तर, आता 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानचा सामना उपांत्य फेरीतील दुसऱ्या विजेत्याशी होईल. त्याआधी आज ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांचा दुसरा उपांत्य फेरीतील सामना रंगणार आहे.

आज भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना भारतीय वेळेप्रमाणे दुपारी 1.30 वाजता खेळला जाणार आहे. दरम्यान, सामन्याच्या 30 मिनिटे अगोदर नाणेफेक होईल. ही नाणेफेक जो संघ गमावेल तो संघ हा सामना जिंकेल असे समीकरण गेले 11 आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यादरम्यान मैदानावर दिसले आहे. या मैदानावर भारतीय संघाने 2 टी 20 सामने खेळले आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने नाबाद 90 आणि नाबाद 64 धावा केल्या होत्या. तर, भारताने हे दोन्ही सामने नाणेफेक गमावून जिंकले होते. दुसरीकडे इंग्लंडने या मैदानावर 2011 मध्ये टी 20 सामना खेळला होता.

भारत-इंग्लंड टी 20 विश्वचषक (T20 World Cup)  उपांत्य फेरी दरम्यान पावसाची शक्यता?

आज 10 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड या होणाऱ्या उपांत्य फेरी सामन्यादरम्यान ॲडलेड ओव्हलवर पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असली तरी दुसऱ्या दिवशी ॲडलेडमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात सुपर 12 ग्रुप 2 मध्ये सामना झाला होता. या सामन्यादरम्यान पावसाने धुमाकूळ घातली होती. त्यामुळे हा सामना मात्र 14 षटकांचा करण्यात आला होता. त्यामुळे उपांत्य फेरीची मजा पाऊस घालवणार काय अशी चिंता चाहत्यांना लागली होती. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पावसाची शक्यता नसल्याने चाहते खुश झाले आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघाचा आज टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. हा सामना ॲडलेड येथे खेळला जाणारा आहे. पावसाचा अंदाज बघता या दोन्ही सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे आज पावसाने या सामन्यामध्ये व्यत्यय आणल्यास राखीव दिवशी हा सामना पूर्ण केला जाईल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!