Eknath Shinde | मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना काल १०२ दिवसांनंतर जामीन मिळाला आहे. त्यांच्या जामीनंतर काल त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी संजय राऊत यांच्या जामीनाबाबत बोलणं टाळलं आहे.
एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांच्या जामीनाबाबत विचारण्यात आलं होतं. यावर राऊतांच्या जामिनाबाबत प्रवक्ते बोलतील, असं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी या बाबात प्रतिक्रिया दिली आहे.
यादरम्यान, जो निर्णय आला तो मान्य करायला हवा, जामीन झाला काय किंवा इतर बाबी झाल्या काय, यावर आम्हाला बोलायचं नसतं, खुनाच्या आरोपीलाही जामीन मिळतो, त्यांना त्यांच्या परीने आनंद साजरा करू द्या. आम्ही आमच्या परीने काय करायचं ते करू. आम्ही आताच काही सांगत नाही, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, माझ्या अटकेचा आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो हमारी सरकार आएँगी ! हे मला माहिती होतं, असा गौप्सस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच. ती सुद्धा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असा घणाघात देखील त्यांनी केला आहे.
यादरम्यान, मुंबई महापालिका, मुंबई आपल्या हातातून काढण्यासाठी शिवसेना फोडलीय हे लक्षात घ्या. पण ते होणार नाही, मी आज आर्थर रोड जेलमधून सुटल्यापासून जे वातावरण पाहतोय की माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकासाठी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात ऊर्जा निर्माण झालीय. ही खरी शिवसेना आहे. हा खरा आपला परिवार आहे, माझी सेक्युरिटी काढली. काढाना. मी तुम्हाला घाबरतो का?, असं म्हणत संजय राऊत चांगलेच बरसले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांनी सांगितलं नोट बंदी मागील सत्य, म्हणाले…
- Eknath Shinde | “आता त्यांना आनंद साजरा करु द्या, आम्ही…”, शिंदे गटाचा राऊतांवर निशाणा
- Supriya Sule | अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या…
- Sanjay Raut | “… अन् ठाकरेंचा उर भरुन आला”, जामीननंतर संजय राऊतांना उद्धव ठाकरेंचा फोन
- Sanjay Raut | “माझ्या अटकेचे आदेश…”, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

