Share

Sanjay Raut | संजय राऊतांच्या राजकीय भेटीगाठी! शरद पवारांची घेणार भेट

Published On: 

Sanjay Raut | मुंबई : संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काल जामीन मिळाला. यानंतर त्यांच जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र, काल कोणत्याही बड्या नेत्याने उपस्थिती लावली नाही. अशातच संजय राऊत यांनी त्यांचं उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलणं झालेलं सांगितलं. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज त्यांच्या राजकीय भेटी घेणार असून राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत.

शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत आज राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. ११ वाजता ही भेट होणार असून या भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र, सर्वांच्या नजरा लागून आहेत त्या म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीकडे. तसेच शरद पवार यांच्यासोबत भेट झाल्यानंतर संजय राऊत उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार आहेत.

यादरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळाल्याचं समजताच उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण राऊत कोठडीत असल्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचं थेट बोलणं होऊ शकलं नाही. यानंतर, जेलमधून सुटल्यावर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. माझ्याशी बोलले. यावेळी त्यांचा उर भरुन आला. मलाही भरुन आलं, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना हा परिवार आहे. रस्त्यात जिथून जिथून मी जात होतो त्या प्रत्येक ठिकाणी लोक थांबून मला अभिवादन करत नव्हते तर शिवसेनेला अभिवादन करत होते. संजय सावंत या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या फोनवर उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. संजयचं अभिनंदन कर, लवकरच त्याला भेटणार आहे, असा निरोप उद्धव ठाकरेंनी दिला. संजय राऊत यांनाही उद्धव ठाकरेंचा निरोप मिळाल्यानंतर धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिली.

माझ्या अटकेचा आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो हमारी सरकार आएँगी ! हे मला माहिती होतं, असा गौप्सस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच. ती सुद्धा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असा घणाघात देखील त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!