🕒 1 min read
IND vs ENG T20 WC | आज भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीतील दुसरा सामना रंगणार आहे. यातील विजेता थेट पाकिस्तान संघाशी भिडणार. टीम इंडीयाने आज विजयाची नोंद केली तर 2007 नंतर प्रथमच टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना चाहत्यांना पाहायला मिळेल. भारताने 2007 मध्ये पाकिस्तानला हरवून पहिला T20 विश्वचषक जिंकला होता.
टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी आज अॅडलेडच्या मैदानावर उतरणार आहे. दोन्ही संघ यापूर्वी एकदा T20 विश्वचषक विजेते ठरले आहेत. आयसीसी क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आणि इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय वेळेनुसार सामना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 1 वाजता टॉस होईल.
दोन्ही संघाचे संभाव्य खेळाडू –
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, दीपक हुडा, हर्षल पटेल, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल
इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), बेन स्टोक्स, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, फिल सॉल्ट, डेव्हिड मलान, सॅम कुरन, मार्क वुड, मोईन अली, आदिल रशीद, टायमल मिल्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली
महत्वाच्या बातम्या :
- Drinking Water Rules | पाणी किती, कोणतं, कसं आणि केव्हा प्यायचं? जाणून घ्या आयुर्वेदात नेमकं काय लिहिलंय
- Eknath Khadse | “खोके घेतले म्हणजे पैसे घेतले नाही”, कोर्टात खेचण्याचा इशारा मिळताच एकनाथ खडसेंची माघार
- Eknath Shinde | संजय राऊतांच्या जामीनाबाबत बोलणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं, म्हणाले…
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांनी सांगितलं नोट बंदी मागील सत्य, म्हणाले…
- Eknath Shinde | “आता त्यांना आनंद साजरा करु द्या, आम्ही…”, शिंदे गटाचा राऊतांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
