Share

पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरे सत्राचा खेळ थांबवला; ऑस्ट्रेलियाकडे २७६ धावांची आघाडी

Published On: 

ब्रिस्बेन :  ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात चौथ्या कसोटीतील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार सुरुवात केली.

मार्कस हॅरिस आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांची सेट जोडी शार्दुल ठाकूरने मोडून काढली. या दिवशी ६७ व्या षटकादरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरे सत्र संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता परिस्थिती पाहून तिसऱ्या सत्राच्या खेळाचा निर्णय घेतला जाईल.

ऑस्ट्रेलियाने ५५ षटकांच्या आत ५ विकेट्स गमावल्यानंतर पुढील २ विकेटसही लवकर गमावल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या कॅमेरॉन ग्रीनला शार्दुल ठाकूरने रोहित शर्मा करवी झेलबाद केले. त्या पाठोपाठ लगेचच ६५ व्या षटकात शार्दुलने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला बाद केले. त्याचा झेल यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १० षटकांच्या आत स्मिथ, ग्रीन आणि पेन यांच्या विकेट्स गमावल्या. ग्रीनने ३७ धावा तर पेनने २७ धावा केल्या. दुसऱ्या सत्राचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क १ आणि पॅट कमिन्स २ धावांवर खेळत होता. तसेच ऑस्ट्रेलियाच्या ६६.१ षटकात ७ बाद २४३ धावा झाल्या असून त्यांनी २७६ धावांची आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!