मुंबई : पुण्यातील वक्फ बोर्डाच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज काही ठिकाणी ईडीकडून कारवाई झाल्याचं समोर आलं. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधीत या विभागावर ईडीच्या कारवाईची चर्चा सुरू होताच, नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी आज पुन्हा एक पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी ईडीकडून कोणत्याच कार्यालयावर ईडीचे छापे पडले नसून, एका ट्रस्टवर छापा पडल्याचं सांगितलं. यावेळी नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डच्या कामाच्या पद्धतीबाबतही माहिती दिली आहे.
माझ्याकडे अल्पसंख्यांक विभागाचा कारभार आल्यानंतर वक्फ बोर्डाचा कारभार सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. वक्फ बोर्डाशी संबंधित व्यक्तींवर छापे पडल्याने नवाब मलिक यांच्या घरात ईडी घुसल्याचे अनेकांना वाटले. पण तसे काही नाही. मी वक्फ बोर्डात स्वच्छता अभियान सुरू केले आहे. त्यामुळे माझ्या स्वच्छता मोहिमेत ईडीचे सहकार्य मिळाले तर मी त्याचे स्वागत करेन. अशा कारवायांना मी घाबरण्याची कारण नाही. माझी लढाई अन्यायाविरोधात आहे. केंद्रीय संस्थांमध्ये क्लीन अप करण्याची माझी मोहीम आहे. ती सुरूच राहणार आहे, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण. https://t.co/AfgmbWjxvf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 11, 2021
दरम्यान, वक्फ बोर्डाशी संबंधितांच्या कार्यालयावर छापे पडले आहेत. त्याचं आम्ही स्वागत करतो. पुण्यातील एक ट्रस्ट आहे. ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्ट, तालुका मुळशी पुणे, हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत रजिस्टर आहे. 19 मे, 2005 ला चॅरिटी कमिश्नरकडून वक्फ बोर्डाकडे ट्रान्सफर झाला. डीन रजिस्ट्रेशनने लोकशाही आघाडी सरकार आलं तेव्हा वक्फ अॅक्ट लागू झाला. त्यामुळे चॅरिटी कमिश्नरकडे असलेल्या संस्था त्याचं डीम रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय चॅरिटी कमिश्नरने घेतला. त्यावेळी मी राज्यमंत्री होतो. आम्हीही वक्फ अॅक्ट 1995 आम्ही लागू केला
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- चंद्रकांत पाटील
- स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगना राणावतची औकात नाही- राजू शेट्टी
- ‘गेले दीड वर्ष मंत्रालयात पाऊल न ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनाही वेतन आणि भत्ते मिळता कामा नये’
- …हा सगळा ड्रग्ज रॅकेटचा खेळ गुजरातमधून चालतोय का?- नवाब मलिक
- जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर


