🕒 1 min read
जळगाव : भारत मातेच्या रक्षणासाठी सेवा देत असताना आणखी एक सुपुत्र शहीद झाला आहे. मूळचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील जवान राहुल लहू पाटील यांना पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी दुपारी एक वाजता वीरमरण आले आहे. वयाच्या ३० व्या वर्षी भारतमातेच्या या पुत्राला हौतात्म्य आलं आहे. ही वार्ता पसरताच गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.
त्यांच्यावर एरंडोल येते शासकीय इतमामात अंत्यसंकर केले जाणार आहेत. शहीद राहुल पाटील हे पंजाबमधील फजलखां येथे जवानांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये त्यांच्या परिवारासोबत वास्तव्यास होते. तर, आज सकाळी साडेसात वाजता त्यांनी गावाकडे असलेल्या आई व भावाशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता. यावेळी त्यांनी पुढच्या महिन्यात परिवारासह घरी येणार असल्याचे सांगितले होते. तसेच पाटील यांनी व्हिडिओ कॉलवर भाऊ व आईला कर्तव्य बजावत असलेले स्थळही दाखवले होते.
मात्र, काळाने घात केला. भारत-पाकिस्तानच्या सीमेवर राहुल पाटील हे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. ते पत्नी व त्यांच्या दोन मुलींसह ते पंजाबमध्येच राहत होते. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एरंडोल त्यांच्या भावाला फोन वरून राहुल हे शहीद झाल्याची माहिती देण्यात आली. ते २००९ मध्ये लातूर येथे लष्करात भरती झाले होते. सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफमध्ये ते कर्तव्यावर होते. त्यांचे पार्थिव पंजाबहून मुंबई व मुंबईहून जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी आणले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनात सरकारची डोकेदुखी ठरत असलेल्या ट्विटरवर भारत सरकार बंदी घालणार ?
- ‘…आणीबाणी, बोफोर्स तोफ खरेदीत खाल्लेल्या कमिशनमुळे झाली नाही, तशी नाचक्की ना?’
- महाराष्ट्रात काँग्रेस आगामी काळात एक नंबरचा पक्ष बनवणार; नाना पटोलेंची डरकाळी !
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- स्मार्ट सिटी सीईओ पद पांडेय यांच्याकडेच राहावे हीच खैरेंची इच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
