Share

राहुल गांधींची तरुणाई! वायनाडमध्ये युवतींसोबत केले स्नेहभोजन

Published On: 

🕒 1 min read

वायनाड : काँग्रेस नेते राहुल गांधी १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान केरळमधील वायनाड या त्यांच्या संसदीय मतदारसंघाच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती रविवारी पक्षाकडून देण्यात आली होती. त्यानंतर आज राहुल यांचे काही फोटो युवक काँग्रेस कडून ट्विट करण्यात आलेत.

या फोटोत राहुल काही तरुणींसोबत गप्पामारत स्नेहभोजनाचा आनंद घेतांना दिसत आहे. या फोटोवर कॅप्शन देण्यात आले आहे की,’ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळच्या मंथवडी येथे जेवणाच्या वेळी विचारशील तरुणाईसोबत चैतन्यशील मनाने विचारमंथन केले. तसेच कौतुकही केले.

तसेच राहुल हे आजच ते मंथवडी मधील गांधी पार्क येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करणार असून त्यानंतर ते पडीनजरथारा येथील कोवलाथोड कॉलनी आणि पोंकुझीतील कट्टुनैका कॉलनी येथे दोन पेयजल प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच त्यानंतर ते नूलपुझा येथील कौटुंबिक आरोग्य केंद्रात (एफएचसी) दंत युनिटचे देखील उद्घाटन करणार आहेत.

दरम्यान, १७ ऑगस्ट रोजी ते कालपेट्टाच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट आहेत. तसेच त्यानंतर ते कारसेरी पंचायत शेतकरी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन असून कारसेरी बँक सभागृह, नॉर्थ कारसे, तिरुवम्बादी येथे शेतकऱ्यांचा सत्कार करतील. त्यानंतर, ते मलप्पुरम येथील वंदूर येथील गांधी भवन स्नेहाराम वृद्धाश्रमातील रहिवाशांसोबत दुपारचे जेवण करतील.

दरम्यान, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व पक्षाच्या माजी खासदार सुश्मिता देव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटरवरही आपल्या प्रोफाईलमध्ये काँग्रेसची माजी सदस्य असा उल्लेख केला आहे. सुश्मिता देव यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपण पक्ष सोडत असल्याचे कळवले आहे. सुष्मिता देव या टीम राहुलच्या सदस्य होत्या.

काही दिवसांपू्र्वी सुष्मिता देव यांनी जेव्हा आपले ट्विटर प्रोफाईल बदलले तेव्हाच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यानंतर आता त्यांचा राजीनामाच समोर आला आहे. सुष्मिता देव यांचंही ट्विटर अकाऊंट काँग्रेसच्या अन्य नेत्यांसह ब्लॉक झाले होते. काँग्रेसकडून त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. राहुल गांधींनीही त्यावेळी केंद्रावर निशाणा साधला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!