🕒 1 min read
उस्मानाबाद : राज्यात गेल्या महिन्याभरापासून एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. राज्य सरकारने (Mahavikas Aghadi) भरगोस पगारवाढ देऊनही हजारो कर्मचाऱ्यांनी अद्यापही आंदोनलाचाच पवित्रा घेतला आहे. तर काही जिल्ह्यात एसटी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
जळगावमध्ये (Jalgaon) एसटी वाहतून सुरु केल्यानंतर एसटीवर दगडफेक केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आत उस्मानाबादमध्ये (Osamanabad) आगार व्यवस्थापकाला वाहक आणि चालकाकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. उस्मानाबादमध्ये गेल्या 22 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. मात्र आंदोलनादरम्यान शनिवारी जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. उस्मानाबाद आगारातून काही बस सुरू करण्यात येत होत्या. आगार व्यवस्थापक पांडुरंग पाटील स्थानकातील उस्मानाबाद-तुळजापूर बस सोडत होते. अचानक बस वाहकाला चक्कर आली आणि तो खाली कोसळला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
आगाराच्या ठिकाणी संप करणारे संपकरी आक्रमक झाले. त्यांनी आगार व्यवस्थापक पांडुरंग पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली, त्यांचे कपडेही फाडण्यात आले. याप्रकरणी व्यवस्थापक पाटील यांनी दोन वाहक आणि एका चालकावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदनगर पोलिसांनी पांडुरंग पाटील यांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाहक दत्ता माने, शंकर पडवळ व चालक गणेश मंडोळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ठाकरे सरकारचा यू-टर्न; दोन लाखांवरील शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही
- …तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील- मुख्यमंत्री ठाकरे
- दक्षिण आफ्रिकेतून स्वदेशी परतलेल्या व्यक्तीला नव्या व्हेरिएंटचा संसर्ग?
- कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- एन.व्ही.रमण
- …तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो?- संजय राऊत

