🕒 1 min read
कानपूर : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने (R.ashwin) न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम (Tom Latham) ला बाद करत इतिहास रचला आहे. भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत, आर अश्विनने हरभजन सिंगला मागे टाकत टॉप-3 मध्ये धमाकेदार प्रवेश केला आहे.
आर अश्विनने कारकिर्दीतील 80 व्या कसोटी सामन्यात 418 वी विकेट घेत ही मोठी कामगिरी केली. भारतासाठी 400 हून अधिक कसोटी बळी घेणारे केवळ चार गोलंदाज आहेत, त्यापैकी तीन आता क्रिकेटपासून दूर आहेत. अनिल कुंबळे आणि कपिल देव निवृत्त झाले आहेत, तर हरभजन सिंगला संघात परतण्याची आशा नाही.
भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे, ज्याने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ६१९ बळी घेतले आहेत, त्यानंतर कपिल देव यांच्या नावावर १३१ कसोटी सामन्यांमध्ये ४३४ कसोटी बळी आहेत. अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, त्यावरून येत्या चार-पाच कसोटींमध्ये तो कपिल देवलाही मागे टाकेल, असे दिसते. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाच्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी किवी संघाने आतापर्यंत चांगली फलंदाजी दाखवली आहे.
52 धावांची धडाकेबाज खेळी खेळल्यानंतर टॉम लॅथमला अश्विनने बोल्ड केले. चेंडूची हालचाल त्याला समजली नाही आणि तो आऊट झाला असे वाटत होते. हा चेंडू त्याला कव्हर्समध्ये खेळायचा होता, पण त्याआधी त्याला बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 345 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला. भारताने दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य ठेवले. शेवटच्या दिवशी चहापानाच्या ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने १४२ धावांत ७ विकेट गमावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील- मुख्यमंत्री ठाकरे
- दक्षिण आफ्रिकेतून स्वदेशी परतलेल्या व्यक्तीला नव्या व्हेरिएंटचा संसर्ग?
- कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- एन.व्ही.रमण
- …तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो?- संजय राऊत
- ‘काँग्रेसची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
