Share

ठाकरे सरकारचा यू-टर्न; दोन लाखांवरील शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळातील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. नियमित कर्जदारांना प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान तर दोन लाखांवरील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे जाहीर केले. परंतु, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती विस्कटल्याचे कारण सांगून आता दोन लाखांवरील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे जाहीर केले आहे.

भाजप- शिवसेना युती सरकारने त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून दीड लाखाची कर्जमाफी दिली. तसेच नियमित कर्जदारांना २५ हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले, तर दीड लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना ‘ओटीएस’च्या माध्यमातून थकबाकीची उर्वरित रक्‍कम भरलेल्यांनाही लाभ दिला. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि फडणवीस सरकारच्या कर्जमाफीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला.

त्यानुसार एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ या काळातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली आणि ३६ लाख ६४ हजारांपैकी ३५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभही दिला.मात्र आता दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या १५ लाखांहून अधिक आहे. त्यांच्यासाठी सरकारकडे पैसा नाही. त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासंदर्भात अजून काहीच निर्णय झाला नसल्याचे सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी हा अचानक यू-टर्न घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!